Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्र्वकल्यान कामगार संघटनेचे दि.19/01/2024 रोजी, बजाज ऑटो एम्प्लॉईज को.ऑप.क्रे. सोसायटीची निवडणूक पारदर्शक आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुट्टीच्या दिवशीच म्हणजे, रविवारीच सकाळी 8 ते 5 वाजता झाली पाहिजे, या मागणीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय पुणे स्टेशन येथील मुख्य सचिव  अशोक गाडे  यांना निवेदन देवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

यावेळी बजाज ऑटो एम्प्लॉईज को.ऑप.क्रे. सोसायटीच्या सभासदांनी सचिव साहेबांच्या पुढे आपले म्हणणे मांडून योग्य तो हस्तक्षेप करून निवडणूक पारदर्शक आणि निरपेक्षपने पार पाडण्यात यावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली.घडलेल्या सर्व घडामोडीचा आढावा घेवून, योग्य आणि सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन सचिव साहेबांनी सर्वांना दिले, अशी माहिती सेक्रेटरी दिलीप पवार व राजेंद्र महाडिक यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version