Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –    आकुर्डी येथे निवासी भागातील धोकादायक भंगार मालाचे दुकान कायम स्वरूपी बंद करा, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर सर चिटणीस सचिन काळभोर यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आकुर्डी प्रभाग क्रमांक १४ मुख्य रस्त्यावर सिद्धेश्वर क्लासिक बिल्डिंग समोर व कचिन टेलर शेजारी एक भंगार व्यावसायिकाचे दुकान आहे . या भंगार दुकानात  दिनांक – १९/०१/२०२४ रोजी रात्री साडेसात वाजता स्फोट होऊन मोठी आग लागली . त्यानंतर किमान चार स्फोट झाले .
या आगी मध्ये चार कामगार किंवा नागरिक भाजूंन जखमी झाले   वस्तु: या भंगार शेजारी कचिन टेलर , सिएरा झेरोक्स , शेजारी समर्थ कॉम्लेक्स , मागे बंड़ेवार बिल्डिंग , गिराम बिल्डिंग , कोरडे बिल्डिंग इतकी वसाहत आहे . आग अधिक पसरली असती तर एवढ्या सर्व परिसराला झळ बसली असती .  भंगार व्यावसायिक भंगाराच्या नावा खाली चोरीच्या वस्तु खरेदी करून विक्री करणे , अवैद्य हाटभट्टी दारूचा व्यवसाय करणे , जुगार अड्डा चालवीणे इत्यादि गैर धंदे राजरोस पणे चालतात . व हे सर्व धंदे शेजारील बिल्डिंग वरुन दिसतात .
  तेथे दारू पिऊन धींगाणा , मारा मारी ही नित्याचीच बाब झाल्याने तसेच तेथे दारू गाळत असल्याने सर्व नागरिक त्या दर्पाने त्रस्त आहेत . म्हणूच तेथील रहिवासी व व्यापारीच्या सह्यांचे निवेदन या पूर्वी २१ जून २०२३ व ०८ ऑगस्ट २०२१  असे दोनदा दिले होते . मात्र गेल्या तीन वर्षात काहीही कार्यवाही झालेली नाही .
  त्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावनां निर्माण झाली आहे .  या पूर्वीचे पत्र व कालची आगिची घटना पाहता सदर भंगार दुकान त्वरित बंद करावे . अन्यथा पुढील दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहील .  भंगार दुकान त्वरित बंद करावे .
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version