Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अयोध्या धाम येथे ‘प्रभु श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त’  महाआरती, दिपोत्सव, स्वछता मोहीम, रामरक्षा, व महाप्रसाद चे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे देवाराम चौधरी, रुपाली पालांडे, भवानी मलगे, रेश्मा काटे ,तेजश्री जगताप, रहीम शेख, मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, फहाद खान, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेतील  मुला, मुलीनी भक्तिगीते, रामायण नृत्य सादर केले. यावी इयत्ता ६ विची शिक्षिका निशा पवार  यांनी “२२ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतीय साठी अभिमानाचा, आनंदाचा दिवस आहे  हा दिवस दिवाळी सारखा साजरा करा, राम हाच आमचा आदर्श आहे असे उद्गार काढले”. बबिता पाटील, रेणु राठी मॅडम आणि शिक्षक संदीप हवेले यांनी “प्रभु श्रीरामांचा जीवन, वनवास तसेच रामायण बद्दल माहिती दिली व  शंकनाद करून आरती, रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्राचे सामुहिक पठण केले.

या वेळी शाळेचा आवारात स्वछता मोहीम तसेच शाळेच्या मुख्यद्वार जवळ रांगोळी, दिव्यांची आरास अत्यंत सुरेख असे नियोजन केले होते व सर्वात शेवटी महाप्रसादाचे उपस्तित पालकांना, राम भक्तांना वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुनंदा साळवी व उर्मिला ठोंबरे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version