Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या २२ जानेवारीला सत्यात उतरत आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा अशी इच्छा देशाच्या प्रत्येक भारतीयांची आहे. प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. त्या अनुषंगाने शत्रुघ्न काटे यांनी सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सायं.६.०० वाजता पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात भव्यदिव्य अश्या प्रभू श्रीराम मूर्तीचे सामूहिक महाआरतीचे आयोजन केले आहे .

देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सर्व रामभक्तांना भावनिक आवाहन केले आहे की २२ जानेवारी रोजी सर्वांनी अयोध्येत येणे टाळावे कारण की जनसमुदाय सागर अयोध्येत आल्यास सुख सोयी सुविधांचा तुटवडा उद्भवू शकतो परिणाम रामभक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत  शत्रुघ्न काटे यांनी प्रभागातील राम भक्तांसाठी २२ जानेवारी रोजी “भव्य सामूहिक आरती सोहळ्याचे” आयोजन केले असून या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

२२ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन , गोविंद यशदा चौक याठिकाणी या “भव्य सामूहिक आरती सोहळ्याचे” निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वीराज थिएटर्सतर्फे गीत रामायण आणि भक्तिगीते , श्रीराम प्राणप्रतिष्ठा अयोध्या थेट प्रक्षेपण, भजन संध्या, रामरक्षा रामनाम जाप पठण, रामलीला कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व लेजर शो चे आयोजन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version