Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम जन्मभुमी मूर्ती प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळा आयोजित केला आहे, हा ऐतिहासिक सोहळा नागरिकांना पाहता यावा याचे साक्षीदार होता यावे त्या निमित्त  रहाटणी पिंपळे सौदागर   येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे युथ  फाऊंडेशन , सागर कोकणे युवा मंचचा  वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि २२/०१/२०२४ रोजी महादेव मंदिर पिंपळे सौदागर, श्री राम मंदिर रहाटणी येथे करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने आज रहाटणी येथील श्री राम मंदीर येथे मंदीर व परिसराची सामुदायिक पध्दतीने स्वच्छता करण्यात आली तसेच यानंतर प्रभु श्री रामाची आरती देखील श्री विठ्ठल उर्फ नाना काटे व इतर उपस्थित मान्यवराचा यांच्या हस्ते करण्यात आली सोमवारी होणाऱ्या भजन, कीर्तन, महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचा तयारीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी रहाटणी राम मंदिर व महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे मोठ्या एलईडी स्क्रिन लावून अयोध्या  श्रीराम जन्मभुमी  येथे होण्यार्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेठ प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

तसेच नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या आयोध्या येथील श्री राम मंदीराच्या प्रतिकृतीचे अनावरण व पुजन श्री नाना काटे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले याचे वाटप आज पासून घरोघरी जावून करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित आदेश राजवडे,  चंद्रकांत तापकीर,  उमेश काटे,  सचिन काळे, . अरूण तांबे,  हरीश तापकीर, महादु कदम, महादेव कोकणे ,  गजानन तांबे,  पप्पुशेठ पठारे,  जिजाबा गोडांबे,  शंकरराव नखाते,  शिवाजीआण्णा राजवडे,  शिवाजी खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version