Spread the love

 

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने कुदळवाडी येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून योग साधनेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे महत्त्व सांगण्यात आले आणि नियमित योगाभ्यासामुळे होणारे मानसिक व शारीरिक फायदे समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.

या प्रसंगी दिनेश यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनायला हवा. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते.”

कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले असून, स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version