Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गट कार्यालयाकडून कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठुनामाचा गजर, अभंग ओव्यांची संगत आणि पावसांच्या सरींसह श्री क्षेत्र देहु ते आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत या दिंडीने मार्गक्रमण केले. कामगार कल्याण आयुक्त  रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

गुणवंत कामगार श्रीकांत (आण्णा) जोगदंड व त्यांच्या पत्नी संगीता यांनी दिंडीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधले. प्रकाश घोरपडे, सुभाष चव्हाण, सुरेश कंक यांनी देखील विविध संतांची वेशभूषा करत संतांच्या विचारांचा जागर केला. यावेळी जाधववाडी येथील कामगार भजनी मंडळाने भजन, अभंग व गवळणी सादर करत वातावरण भक्तीमय केले. ह.भ.प.शामराव गायकवाड महाराज यांनी देखील प्रवचनातून उपस्थितांचे प्रबोधन केले.

व्याख्यात्या श्रीमती शारदा मुंडे, साहित्यिक .राजेंद्र घावटे, कामगार भूषण  राजेंद्र वाघ गुणवंत कामगार कल्याण मंडळ संघटनेचे सचिव राजेश हजारे, उपाध्यक्ष तानाजी एकोंडे,शरद कानेकर,यांच्यासह विविध आस्थापनांचे शंभरपेक्षा जास्त कामगार व कामगार कुटुंबिय दिंडीत सहभागी झाले होते.

मंडळाच्या पुणे विभागाचे प्र.सहायक कल्याण आयुक्त .मनोज पाटील यांच्या नेतृत्वात अधिक्षक संजय थोरात, कल्याण निरिक्षक .संदिप गावडे, केंद्र संचालक प्रदिप बोरसे, .सुनिल बोरावडे, श्री.अविनाश राऊत, अनिल कारळे यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कामगार प्रबोधन दिंडीची ही संकल्पना मागच्या वर्षीपासून आम्ही प्रत्यक्ष अंमलात आणली. या वर्षी कामगार अधिक उत्साहाने सहभागी झाले, प्रचंड पाऊस असताना या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. हा उपक्रम कामगारांसाठी अधिक व्यापक आणि उपयुक्त करण्याचा आमचा माणस आहे‌.
-रविराज इळवे, कामगार कल्याण आयुक्त

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version