Spread the love

 

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (दि.१५) अचानक कोसळला. या घटनेत पूलावरून प्रवास करत असलेले अंदाजे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते. तसेच ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची अधिक माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती आहे. या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे. या ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version