Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रणरागिणी महिला मंडळाच्या संस्थापिका आणि आनंद घन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा  निशा मधुकर रसाळ यांना त्यांच्या समाजकार्याबद्दल “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यामुळे त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय मान्यता लाभली आहे.

निशा रसाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, वृद्धांच्या सेवेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रणरागिणी महिला मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा ध्यास लक्षणीय ठरला आहे.

तसेच, “आनंद घन वृद्धाश्रम” या उपक्रमातून त्यांनी वयोवृद्ध नागरिकांसाठी स्नेहपूर्ण आणि सन्माननीय आयुष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे योगदान समाजासाठी एक आदर्श ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही त्यांच्या कार्याची अधिकृत पावती मानली जात आहे. या गौरवामुळे त्यांच्या सामाजिक कार्यास नवचैतन्य प्राप्त होणार असून, इतरांना देखील प्रेरणा मिळेल.

समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, आणि उपस्थितांनी निशा रसाळ यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version