Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोशी, पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या नवीन न्यायालय इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वरिष्ठ अधिकारी श्रीमती घावटे यांनी सदर बांधकामाची सद्यस्थिती मांडली.

त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या नवीन इमारतीचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल 2026 पर्यंत संपूर्ण व्यवस्थात्मक काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सद्यस्थितीचे फोटो सादर करत PWD कडून प्रत्यक्ष प्रगती दाखवण्यात आली. या वर्षी अठरा कोटी रुपये निधी मंजूर असून, पुढील बांधकामासाठी आणखी 50 कोटी रुपये आवश्यक आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे यांनी उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. बैठकीनंतर पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती  श्रीमती रेवती मोहिते डेरे यांची मुंबई उच्च न्यायालयात भेट घेण्यात आली. त्यांना संपूर्ण आढावा सादर केला गेला असून, निधीच्या मागणीसंदर्भात लवकरच उच्च न्यायालयामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी स्वतः मोशी येथे प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाची माहिती घेण्याचा मानसही व्यक्त केला. या बैठकीत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेचे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.  संजय दातीर पाटील,   ॲड.  रामराजे जी. भोसले पाटील, अॅ ॲड प्रसन्न लोखंडे,  ॲड.  अजिंक्य लोमटे,  ॲड.  सय्यद सिकंदर अली आदी  उपस्थित होते.

ॲड. अतिश लांडगे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालय सुरू होणार आहे, यामुळे संपूर्ण शहरातील वकिल, न्यायप्रेमी व नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version