Spread the love

 

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्यावतीने मराठा तरुणांचे व्यवसायाकडे मन वळविण्याच्या उद्देशाने येत्या ११ जून रोजी एक दिवसीय विशेष व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी केले आहे.

या प्रशिक्षण शिबिरात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, मराठा सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष विजय घोगरे, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

हे प्रशिक्षण शिबीर ११ जून रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी चार या वेळेत द गजेबो हॉटेल वाकड येथे होणार आहे. मराठी तरुणांनी नोकरीच्या जंजाळात न अडकता उद्योग व्यवसायात करिअर करावे, हा या शिबिराचा उद्देश आहे. त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य देखील मराठा सेवा संघातर्फे करण्यात येईल. तरुणांनी अधिक माहितीसाठी 9270326489 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version