Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या नियोजनाची बैठक  नवी सांगवी येथे पार पडली.

या बैठकीमध्ये प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांवर जयंतीची ठरलेली जबाबदारी देण्यात आली.आणि जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्याचे प्रयोजन करण्यात आले. जयंती महोत्सवासाठी महापालिकेच्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा करून महोत्सव कार्यक्रमास भरघोस सहकार्य केल्याबद्दल जयंती महोत्सव समितीच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांचा बैठकी दरम्यान  विशेष सन्मान  करण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. सूत्रसंचलन मनोज मारकड यांनी केले आणि आभार आशा काळे यांनी मानले.  जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा विणा सोनवलकर यांच्यासह माजी नगरसेवक राजू दुर्गे, सूर्यकांत गोफणे, महावीर काळे, मनोज कुमार मारकड, गणेश खरात, अभिमन्यू गाडेकर, आशा काळे, तेजस्विनी दुर्गे, रेखा दूधभाते, नरेंद्र चऱ्हाटे, संदिपान सामसे, गजानन वाघमोडे, संतोष पांढरे, शिवाजी बिटके, सचिन सरक, विठ्ठल देवकाते, जितेंद्र मदने, दत्ता सोनवलकर, अंबादास पडळकर, नवनाथ बीडे, दत्ता शेंडगे, सुधाकर सूर्यवंशी, दीपक नाचन, भास्कर गाडेकर, शुभम महानोर, संजय नायकवडे, सतीश देवकाते, सागर मदने, बापू गडदे, बाबा चितळकर, दत्तात्रय खांडेकर, परेश नरोटे, शिवाजी गावडे, मधुकर सलगर, दादासाहेब देवकाते, संतोष वाघमोडे, राजकुमार जाधव, दयाराम देवकाते, आदी  उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version