Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मोहन नगर येथे तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीपासून सुरुवात करण्यात आली. पुढे गाय वासरू चौक दत्त मंदिर चौक शिवदर्शन कॉलनी या मार्गे राम मंदिर रामनगर येथे समारोप करण्यात आला.

रॅलीमध्ये महिला व युवा मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाले . भारतीय सैनिकांचा विजय असो व जय जवान जय किसान तसेच भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला .

सदर कार्यक्रमाचे संयोजक  गणेश लंगोटे उपाध्यक्ष भा.ज.पा  व मंडलाध्यक्ष धरम वाघमारे तसेच या पदयात्रेस माजी नगरसेविका जयश्री  वाघमारे कैलास कुटे, नंदकुमार भोगले , ज्योती शिंदे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version