Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – निगडी प्राधिकरणातील नागरिकांना येत्या शुक्रवार दि. 23 रोजी नाटक, नृत्य, गाणी,खेळ अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मनोहर वाढो कर सभागृह,ज्ञान प्रबोधिनी विद्यालय,सेक्टर नंबर 25, प्राधिकरण निगडी येथे सायंकाळी पाच ते साडेसात या वेळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजपचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे आहेत तर निमंत्रक साहित्य संमेलन प्रमुख अर्चना वर्टीकर तसेच प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक आहेत.

या कार्यक्रमात ‘फुलोरा’ निर्मित ‘एकमेका सहाय्य करू’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे. लेखिका अर्चना वर्टीकर असून दिग्दर्शन मंगेश वर्टीकर यांचे आहे. या एकांकिकेत भारतीय फरांदे,अनुराधा पेंडूरकर,पद्मा जक्का, आशा नष्टे, प्रदीप गुरव,नरेंद्र मिसाळ, विलास बेलेकर,शिवाजी जक्का, अलका बेलेकर,संजय कुंभार,चंद्रशेखर जोशी, शरद यन्नूवार, अरुण वाकनीस, मनीषा मिसाळ ,मनोहर जोशी, रमाताई सरदेसाई, सुनिता यन्नूवार,सीमा मुळे, शुभदा मेंगळे,कमल जगताप, भानुदास सोनगिरे,अनुराधा कुलकर्णी,कुंदा कोळपकर, मंजिरी कुलकर्णी, रश्मी साटम या कलाकारांच्या भूमिका आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी दिली. सदरचा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version