Spread the love

 

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवीतील तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भगवान बुद्ध, भगवान महावीर, सम्राट अशोक, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महामानवांच्या प्रतिमांचे पूजन सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, संजय मराठे, सतीश चोरमले, मोहन बारटक्के, पॅंथर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गौतम डोळस, बाळासाहेब पिल्लेवार, उज्ज्वला जाधव, भामा ठोसर, प्रमिला भालेराव, उषा शिंदे, सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते.

मानव कांबळे म्हणाले, मैत्र भावाने जग जिंकता येते. महामानवांनी समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्च केले.
अरुण पवार म्हणाले, की महामानवांचे विचार व कार्य आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण आपला, समाजाचा व आपल्या देशाचा विकास करावा. त्यावेळेस खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करीत आहोत हे सिद्ध होईल. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा वारसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होऊन तो पुढे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेला.

गजानन पातुरकर यांनी सूत्रसंचालन, तर मगन सावंत यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप शेलार, गुलाब गायकवाड, संताराम निकाळजे, गजेंद्र जाधव, चंद्रकांत कांबळे, चंद्रभान वाकोडे यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version