Spread the love

 

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे स्वीकृत संचालक पदी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवा निवृत्त सचिव सतीश चांभारे ( सुपेकर ) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, संचालक हिरामण सातकर, दत्तात्रय सातपुते, आनंदराव काळे, साहेबराव दुंडे, कार्यकारी संचालक नानासाहेब टाकळकर, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संजय घनवट, संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे, भास्कर जगदाळे यांचे उपस्थितीत सतीश चांभारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातून आलेले चांभारे हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० वर्षे सचिव पदावर सेवाभाव वृत्तीने कार्यरत होते.

खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. सहकार महर्षि आप्पासाहेब सातकर यांचे पश्चिम भागातील जुन्या पिढीतील खंदे समर्थक व बाजार समितीचे माजी संचालक स्व. धोंडीभाऊ चांभारे यांचा त्यांना वारसा लाभलेला आहे. चांभारे हे खेड तालुक्याचे पश्चिम भागातील सुपे सातकरवाडी गावचे असून पश्चिम भागाला संचालक पदाची संधी मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. त्यांच्या निवडीचे तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे. आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांचेसह अनेक सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत करून चांभारे यांचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version