Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल  आज मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.

त्यानुसार, मंडळाने सोमवारी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.

कुठे पाहता येईल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही घेता येईल. शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version