Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकाराच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी एनजीओ आहे हे करत असताना संस्था सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत असते. नुकतेच मावळ मधील ताजे ग्रुप ग्रामपंचायत भागात राहणाऱ्या गोरगरीब व गरजू 18 कातकरी आदिवासी कुटुंबांना संस्थेने किराणा साहित्याचे वाटप केले.

गोरगरिबांच्या आयुष्यात काही क्षण सुखाचे व आनंदाचे पेरल्याचा संस्थेला अभिमान आहे. यावेळी ताजे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ताईबाई हिरामण केदारी तसेच उपसरपंच रेश्मा गणेश गायकवाड व इतर सदस्य व ग्रामस्थ तसेच जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सणस, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, खजिनदार रोहिणी यादव, सदस्य राजू डोगीवाल, प्रकाश गडवे, प्रकाश पाटील, राजेंद्र कदम, ओंकार भागवत व मावळचे समन्वयक सुनील गुजर तसेच आदिवासी कातकरी समाजाचे अनेक कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष नितीन यादव यांनी संस्थेच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर ठेवला व माहिती अधिकाराची ताकद कशी असते याबाबतची उदाहरणे सांगितली यावेळी मावळ भाजपाचे सचिव मच्छिंद्र मारुती केदारी यांनी संस्थेच्या व्यापक सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले प्रस्तावना सुनील गुजर यांनी केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव उमेश सनस व मावळचे समन्वयक सुनील गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version