Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ख्रिस्ती बांधवांद्वारे साजरा केला जाणारा ईस्टर संडे दापोडी येथील विनयार्ड वर्कर्स चर्चमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा पवित्र दिवस ख्रिश्चन श्रद्धेतील मूलभूत स्तंभ असून, आशा आणि नवजीवनाचे प्रतीक मानला जातो.

यावेळी चर्चचे संस्थापक बिशप डॉ. पीटर डेव्हिड सिलवे आणि पास्टर डॉ. जयश्री पीटर सिलवे यांच्या नेतृत्वाखाली चर्चमध्ये उपस्थितांनी स्तुती-प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश येशू ख्रिस्ताने मृत्यूवर मिळवलेला विजय आणि अनंत जीवनाच्या आशेवर आधारित होता, असे बिशप पीटर यांनी यावेळी सांगितले. ईस्टर ही देवाने मानवाला दिलेली एक हमी आहे. जीवनात कितीही अडचणी, दुःख किंवा अपयश आले, तरी देवाच्या सामर्थ्याने आपण पुन्हा उभे राहू शकतो. यावेळी मोठया संख्येने ख्रिस्त बांधव उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version