Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विनीयार्ड वर्कर्स चर्च, दापोडी येथे गुड फ्रायडे भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभु येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या उद्धारासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करण्यासाठी ख्रिस्ती नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

यावेळी संस्थापक बिशप डॉ. पीटर डेव्हिड सिलवे आणि पास्टर डॉ. जयश्री पीटर सिलवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष सभेमध्ये दिलेल्या संदेशाद्वारे “गुड फ्रायडेचा आध्यात्मिक अर्थ विशद करण्यात आला.
बिशप पीटर म्हणाले, की प्रभु येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानामध्ये दैवी प्रेम आणि उद्धाराची आशा कशी दडलेली आहे. क्रूस हे केवळ वेदनेचे प्रतीक नसून, देव आणि माणसामधील पुनर्मिलनाचा एक पवित्र आणि दैवी सेतू आहे.
सभेचा समारोप येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित नाट्यप्रस्तुतीने करण्यात आला. या नाट्याद्वारे त्यांच्या जन्मापासून ते क्रूसावरील बलिदानापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे प्रभावी चित्रण झाले. विनीयार्ड वर्कर्स चर्च, दापोडी येथे ईस्टर संडेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी सकाळी १० वाजल्यापासून प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version