Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय (नेहरूनगर) तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ई-फायलिंग व संगणकीय प्रशिक्षक ॲड. अतिश लांडगे, ॲड. लालचंद ओसवाल यांच्या हस्ते झाले.

ई-फायलींग सिस्टीम ही देशातील कोणत्याही उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटले दाखल केले जाऊ शकतात. हे इंग्रजी आणि स्थानिक भाषा मध्ये वकील व पक्षकारांना व्यापून टाकणाऱ्या व्यापक गटापर्यंत पोहोचण्यासाठी केले आहे. यातून वकील आणि पक्षकारांचा प्रवासाचा वेळ, पैसा, वाचतो. उच्च न्यायालयात आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ऑफिस मध्ये बसून केस चालवू शकतो तसेच पेपर फूटप्रिंट कमी करून पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होण्यास ही मदत होते असे मत ई- फायलिंग प्रणालीचे मास्टर ट्रेनर ॲड. अतिश लांडगे यांनी व्यक्त केले.

काळानुरूप बदलत जाणारे ई-फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान वकिलांनी आत्मसात करावे तसेच या शिबिराचा लाभ सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ वकिलांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी केले.

hrrqt://filing.eborrrv.gov in/ या ई-फायलिंगच्या संकेत स्थळावरून वकिलांची नोंदणी करणे, दावा/तक्रार दाखल करणे त्याचबरोबर जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये दररोज चालणारे न्यायालयीन कामकाज कसे करायचे, याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे आणि ॲड. ओसवाल यांनी केले. या शिबिरामध्ये पेपरलेस न्यायालयीन कामकाज करण्यासाठी वकिलांना मार्गदर्शन करण्यात आले. ई-न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळांची माहिती या प्रसंगी देण्यात आली. भविष्यात असेच विविध मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी दिले. या कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक वकिलांनी सहभाग घेतला.

ई- न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळे –
https://ecommitteesci.gov.in

https://njdg.ecourts.gov.in/njdgnew/index.php

https://services.ecourts.gov.in/ecourtindia_v6

https://districts.ecourts.gov.in

https://filing.ecourts.gov.in/.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, ऑडिटर ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संघर्ष सूर्यवंशी, ॲड. मानसी उदासी यांनी केले.ॲड. संकेत सरोदे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version