Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रजासत्ताक दिनानिमित जिल्हा परिषदेच्या वरसोली शाळेला ISO को-ऑर्डीनेटर लक्ष्मीकांत सहादू यांच्या हस्ते ISO मानांकन जि. प. शाळा, वरसोली या शाळेला प्रदान करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी ते स्वीकारले.

त्याप्रसंगी वेहेरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास विटे, वरसोली गावचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच अरविंद बालगुडे, उपसरपंच नलिनी खांडेभरड, सदस्य मंदा पाटेकर, रजनी कुटे, नारायण कुटे, राहुल सुतार, विजय महाडिक, तसेच सरपंच सारिका खांडेभरड, सदस्य शाम येवले, हनुमंत शेलार, भागवत खांडेभरड, नामदेव पाटेकर, राजू खांडेभरड तसेच गावचे पो. पा. हिरा खांडेभरड, ग्रामसेवक दिपक शिरसाट आदी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. तर रविंद्र इथापे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version