Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असते. शहरातील नागरिकांना स्वच्छ्तेची सवय व्हावी म्हणून महापालिकेचाआरोग्य विभाग कायम जनजागृती मोहीम राबवत असतो. कचरामुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेच्या वतीने घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया केली जाते.

तरीदेखील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा टाकत आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा नागरिकांना कारवाई करण्याचा इशारा देऊन ही त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याने निदर्शनास येताच धडक मोहिमेंतर्गत बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक ठिकाणाचे आरोग्य दूषित केल्याप्रकरणी आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आली. या कारवाईतून अकरा हजार रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version