Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने “मध्यस्ती जनजागृती कार्यक्रमाचे” आयोजन पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचे फुलांचे रोपटे देत स्वागत करून करण्यात आली. याप्रसंगी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. एन. आर. गजभिये, न्यायाधीश श्री. एम. जी. मोरे, श्रीमती. एस.एस. चव्हाण, श्री. एन. एन. गवळी, श्रीमती. टी. एस. महाडिक, श्री. बी. डी. चोखट, श्री. व्ही. एस. गायकवाड, श्रीमती. पी. डी. पाटील, वकील मध्यस्थ ॲड. अतिष लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. अतिश लांडगे, पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. एन. आर. गजभिये साहेब व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी ॲड. अतिष लांडगे म्हणाले की, बऱ्याच लोकांना मेडिएशन हा विषय माहीत नसतो त्यामुळे वर्षानुवर्ष वाद न्यायालयातच सुरू राहतात, वैवाहिक जीवनामध्ये किरकोळ कारणामुळे न्यायालयात गेलेल्या अनेक जोडप्यांना मेडिएशन द्वारे एकत्र आणल्याचे विविध उदाहरणाद्वारे लांडगे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. मेडिएशनची संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात येते.तसेच कौटुंबिक केसेस मधे मीडिएशन ला कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. मिडियेटर समोर झालेल्या तडजोडीला कोणताही न्यायालयात आव्हान देता येत नाही यातून पक्षकाराचा पैसा व वेळ यांची बचत होते. न्यायाधीश श्री. गजभिये साहेब म्हणाले की, मेडिएशन म्हणजे दोन्ही पक्षकारांमध्ये मध्यस्थी करून योग्य तो मार्ग काढणे अनेक वेळा आम्ही न्यायनिर्णय देत असताना तो निकाल कोणीतरी एकाच्या बाजूने किंवा विरोधात तो निर्णय दिला जातो परंतु, मध्यस्थी यशस्वी झाल्यानंतर यातून दोन्ही पक्षकारांच्या हिताचा निर्णय होऊ शकतो आणि याचे समाधान आमच्या मनाला जास्त असते.
बारचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी वकील व पक्षकांरानी मेडिएशन प्रक्रियेचा अधिकाधिक उपयोग करून प्रलंबित दावे लवकर निकाली काढण्याचा पर्याय अवलंबवा असे आवाहन त्यांनी उपस्थित असणाऱ्या वकील व नागरिकांना केले. ॲड. लांडगे यांनी चांगल्या प्रकारे मीडिएशन द्वारे केसेस सोडविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री भूषण गवई साहेबांच्या सहीचे प्रशस्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा च्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित सर्व न्यायाधीश, वकील व नागरिक यांना पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांच्यामार्फत शांती, अहिंसा आणि सामाजिक सदभावनेची शपथ देण्यात आली.

यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे मा. उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळुक, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. महेश टेमगिरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संगीता परब, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. सनी काटे, ॲड. सौरभ काटे, ॲड. धनराज पवार, ॲड. अनिल शेजवाणी, ॲड. धीरज कुचेरीया, ॲड. गणेश राऊत, ॲड. मिताली वाखारे, ॲड. भोंडे व इतर वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, सदस्य ॲड. विकास शर्मा, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले. ॲड. अक्षय फुगे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version