Spread the love

 

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ( स्वायत्त) आकुर्डी येथे समर्थ भारत अभियान योगदान कार्यशाळा विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अंतर्गत पार पडली. तीन सत्रात वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्याते. प्रा. प्रदीप कदम यांनी प्रथम सत्रात युवक आणि कौशल्य विकास यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कौशल्यातून सक्षम तरुण निर्माण होऊ शकतो.” दुसऱ्या सत्रात डॉ. गणेश ढवळे यांनी आत्मनिर्भर युवक या विषयावर “विद्यार्थी व तरुणांच्या आत्मनिर्भरतेत राष्ट्राचे हित आहे” असे सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर तृतीय सत्रात मा. विजय गोरडे यांनी आधुनिक युवक व तांत्रिक कौशल्य यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात तांत्रिक कौशल्याचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना अश्या कार्यक्रमांतून विद्यार्थी घडतो. यासाठी विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम आवर्जून अनुभवावेत असे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एच बी सोनवणे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. एस एल भोई, डॉ. अमोल बिबे, प्रा. अमोल मातोरे, प्रा. पी बी समिंदर, प्रा. पल्लवी टाळे, प्रा. सायली सुरवसे, प्रा. दीप्ती देवकर, प्रा. दीपक सपकाळे, प्रा. सविता वासुंदे , प्रा. ज्योती झेंडे, प्रा. विक्रांत शेळके उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरती जाधव, साक्षी डोंगरे, अपूर्वा भालेकर, ऐश्वर्या वाकसे, समृध्छी चोरघे, वैष्णवी साठे, प्रवीण लोंढे, विशाल गायकवाड, अस्मिता बनसोडे, अंकिता कांबळे, सानिया शेख, भूषण आत्तरदे, स्मिता आवटे, करुणा गाविक व शिक्षकेतर कर्मचारी करण साखरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी मा. अजितदादा पवार संस्थेचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मा. ॲड. संदीप कदम , मानद सचिव,पू. जि. शि. मंडळ, उपाध्यक्ष रजेंद्रजी गाडगे, सहसचिव ए एम जाधव, खजिनदार मोहनराव देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांना सहभागिता प्रमाणपत्र देऊन व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version