Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील ताम्हीनी गावांमध्ये आदिवासी कातकरी वस्तीवर जाऊन तेथील ३५ महिलांसोबत हळदीकुंकू समारंभाचे अवचित्य साधून गरजू महिलांना साडी साखर लहान मुलांना बिस्कीट पुढे इत्यादींचे वाटप केले.तसेच त्या वस्तीवरील ५५ लहान मुले महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप केले यासाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवडगाव सप्तशृंगी मेडिकल काळेवाडी यांनी औषधांची मदत केली. आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर मृणाल फोंडेकर यांनी मदत केली.

या कार्यक्रमाचे संयोजन
सुनिता गायकवाड,प्रिया पुजारी, संध्या स्वामी, सायली सुर्वे,रूपाली कड, दिपाली ओव्हाळ, मोहिनी सुर्यवंशी, सुनंदा निक्रड, मनिषा आगम,स्वाती म्हेत्रे, विजयश्री काणे, शोभा सावंत,ऐश्वर्या नायक, मनोहर कड, मोहन गायकवाड,राजेंद्र फडतरे,आनंद पाथरे, सत्वशीला जगदाळे,अनिल जगदाळे,जयवंत सूर्यवंशी, कृष्णा पाटील, श्वेता मोरे,रोहित मोरे,सिद्धी होवाळ,तनुजा ताकवले यांनी केले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version