रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी औंधकॅम्प येथील २४ मराठा लाईट इन्फन्त्री कमांडर हवालदार बाबुराव धुमाळ, शिपाही पावणेंद्र शुकला, माजी नगरसेविका निर्मला कुटे , संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव , एम.बि कॉम्प्युटर प्रोप्रायटर मोहन भालेराव , उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, प्रमुख पाहुणे, शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक पस्थित होते.
यावेळी तिसरी आणि पाचवीचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे गीतवर नृत्य सादर केले. तसेच खुशबू सिंग , मनीषा चौधरी , राजवीर चौधरी , तेजस गायकवाड, ज्ञानेश्वरी काटे , मंथन जाधव आणि स्वराली शिंदे यांनी आपल्या भाषणातून भाषण केले. प्रीती रोठे यांनी देशभक्तीचे गीतवर नृत्य नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रज्ञा शिरोडकर व आभार भावना देवरे मॅडम यांनी मानले.
