Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे. सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे. तेथे १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण होत आहे.

या प्राचीन महादेव मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव येथे भरतो, महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येथे येत असतात. त्यामुळे या प्राचीन महादेव मंदिर परिसरास शोभेल असे या सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्यात यावे अशा सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. या कामासाठी नाना काटे यांनी वेळोवेळी महापालिका यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून या सिमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्याचा कामास सुरुवात करण्यात आली आहे. महाशिवरात्री उत्सवापूर्वी हे शिल्प बसविण्याचे काम पूर्ण होईल असे मनपा अधिकारी ठेकेदार यांचा वतीने सांगण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version