Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी येथील क्रांतीवीर हेमु कलानी यांच्या ८२ व्या पुण्यतिथी निमित्त आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन ,पिंपरी येथील योगा ग्रुप, भारतीय सिंधु सभा, हिंदू समाज पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक हेमु कलानी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी सिंधी समाजातील सामाजिक, प्रतिष्ठीत, व्यायारी, आणि महिला यांची उपस्थित होते.

हेमु कलानी यांच्या जीवनावर आधारित माहीती देताना सांगितले की हेमु कलानी यांचा जन्म २३ मार्च १९२३ रोजी सिंध प्रांतातील शिकारपुर या गावात झाला जो भाग आज पाकिस्तानात आहे आणि २१ जानेवारी १९४३ ला या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली म्हणून आजचा दिवस संपूर्ण सिंधी समाज शहीददीन म्हणून पाळतात हेमु कलानी हे अगदी तरुण वयात स्वराज सेना या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत होते आणि ते संघटन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन या संस्थेशी संलग्न होती या विविध संघटना,संस्था यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सिंधी समाज संघटन चे अध्यक्ष मनोहर जेठवानी, किरण रामनानी अजित कंजवानी,सुशील बजाज,तुलसीदास तलरेजा,श्रीचंद नागरानी,नरेश गरेजा,राम आसवांनी, हिरालाल रिझवानी, विनीता बसंतानी, ज्योती मुलचंदानी,रवीना मिरानी, वर्षा चौधरी, शारदा दासानी , दिलीप बसंतानी,सुरिंदर मंघवानी, सुनील कुकरेजा,आदी मान्यवरांनी केले होते या वेळी देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version