Spread the love

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेच्या वतीने मावळ तालुक्यासाठी पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर करंडक आंतर शालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा पहिली ते चौथी प्राथमिक गट व पाचवी ते दहावी माध्यमिक गट अशा दोन विभागात होणार असून, प्राथमिक विभागाच्या स्पर्धा ११ फेब्रुवारी रोजी व माध्यमिक विभागाच्या स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत श्रीरंग कलानिकेतन सभागृह, वनश्री नगर, तळेगाव दाभाडे येथे होणार आहेत. तसेच या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता होईल.
या स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेचे कार्यालय शुभम कॉम्प्लेक्स, चाकण रोड, तळेगाव स्टेशन येथे मिळतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी ही आहे.

मावळ तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख नयनाताई डोळस (९९२१३८७३०७), भगवान शिंदे (९८२२७२५४५१) व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे – मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version