Spread the love

 

संस्कार, सेवा व शिक्षा या त्रिसूत्रीवर शिक्षण देणारे गुरुकुल

नगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांनी शिकवलेल्या संस्कार, सेवा व शिक्षा या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षण देणाऱ्या केडगाव येथील श्री आनंद पार्श्व गुरुकुलची नूतन भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. केडगाव अकोळनेर रोडवर 5 एकर प्रशस्त जागेत निसर्गाच्या सान्निध्यात आनंद नवकार परिवार ट्रस्टमार्फत भव्य गुरूकुलची उभारणी करण्यात येत असून या वास्तूचे भव्य उद्घाटन रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

श्रमण संघीय युवाचार्य श्री महेन्द्रऋषिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा., प्रबुध्द विचारक श्री आदर्शऋषिजी म.सा., श्री हितेन्द्रऋषिजी म.सा., संस्कार दिवाकर श्री आलोकऋषिजी म.सा., श्री धवलऋषिजी म.सा. तसेच अन्य साधुसाध्वीजींच्या पावन सानिध्यात विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे व अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांच्या शुभहस्ते नूतन वास्तूचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन कॉन्फरन्स दिल्लीचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष रमणलाल लुंकड हे भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष सौरभ बोरा आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा.निलेश लंके, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, राजकुमार चोरडिया, सुजाता लोढा, आस्था कटारिया, राजेंद्र मुथा, संजय चोपडा, विपुल शेटिया आदी मान्यवरांसह पुणे, नगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित असणार आहेत.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अशोककुमार पगारिया यांनी सांगितले की, प्रत्येक कुटुंबातील मुले, मुली यांना शिक्षणाबरोबरच संस्कारही मिळाले पाहिजे. यांच्या मनात सेवाभाव असायला हवा, समस्त जगाचे कल्याण इच्छिणारी मनोभूमिका हवी, सर्वांना सोबत घेवून चलण्याची हातोटी हवी हे आचार्यश्रींचे स्वप्न होते. तेच स्वप्न साकारण्यासाठी सन 2009 मध्ये आनंद पार्श्व गुरुकुलची स्थापना करण्यात आली. याठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देऊन त्याला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे याठिकाणी शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आत्मविश्वासाची आणि चारित्र्यसंपन्नतेची शिदोरी मिळवतो. या शैक्षणिक सेवा कार्याचा विस्तार होत असल्याने संस्थेने नवीन सुसज्ज अशी गुरुकुल इमारत उभारली आहे. या उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक पारख, सचिव राजकुमार लुणिया, कोषाध्यक्ष मोहन बरमेचा व सर्व विश्वस्तांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version