Spread the love

अमृतमहोत्सवानिमित डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संत तुकारामनगर येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

संतसाहित्याचे अभ्यासक, आळंदी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. शिवाजीराव मोहिते आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे; तसेच लेखक श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेणार असून, सदरचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या सभागृहात बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजता होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version