Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी संस्कार  जत्रेचे उद्घाटन सत्तारूढ पक्ष नेते  नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, विश्वेश्वर मंदिराचे सचिव अशोक पाटील, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच कामगार बंधू त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी कुमारी सुप्रिया लोहार येणे गणेश वंदना सादर केली.उद्घाटनापूर्वी संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने बिजली नगर परिसरांमधून प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते या अभियानात प्रतिभा कॉलेज चिंचवड तसेच एटीएसएस कॉलेज चिंचवड आणि डॉक्टर डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांचे एनएसएसचे विद्यार्थी बहुसंख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

उद्घाटन झाल्यानंतर चित्रकला स्पर्धा मॅच मस्ती स्पर्धा आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धा आज संपन्न झाल्या अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद शाळा विद्यार्थी आणि पालक यांनी दिला होता.  प्रास्ताविक संस्थेच्या उपाध्यक्ष नम्रता बांदल यांनी केले. सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष रंजना जोशी यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version