Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाची विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तीन तज्ज्ञ सदस्य मुल्यमापन आणि मान्यता समिती ने तपासणी केली आणि त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व निकषांच्या आधारावर ” ब ” दर्जा दिला आहे.

महाविद्यालयाची स्थापना संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१० मध्ये केली.१२ विद्यार्थ्यांच्या पासून सुरु झालेल्या या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त बी ए, बी कॉम, एम ए,एम कॉम,एम बी ए,या अभ्यासक्रमामध्ये एकुण ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या नॅक मानांकन मुळे महाविद्यालयाचे व्यवस्थापन, अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया,प्राचार्य सदाशिव कांबळे,आणि नॅक समन्वय समिती प्रमुख डॉ हनुमंत शिंदे,प्रा प्रवीण म्हस्के,प्रा. प्रशांत रोकडे व सर्व स्टाफ सदस्य यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version