Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज दिव्यांग भवन मोरवाडी, पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड हद्दीतील म्हाडा गृह प्रकल्पातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे म्हाडा यांच्यामध्ये समन्वय बैठक झाली. या बैठकीत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याशी म्हाडा सदनिका धारकांना भेडसावणाऱ्या विविध पायाभूत समस्या सोडवण्यासाठी चर्चा झाली. याशिवाय अन्य शहर विकासाच्या कामांबाबत व नागरी हिताच्या कामांची सोडवणूक करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी पुणे  म्हाडाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे, प्रा. दत्तात्रय भालेराव, पुणे म्हाडाच तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version