Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वानिमित्त  दि.३ जानेवारी २०२५ रोजी महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावर करण्यात आले आहे.

         महापालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या विचार व कार्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रबोधन पर्व साजरे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version