Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट  असोसिएशन   यांनी मागील आठवड्यात जिल्हा न्यायाधीश महाजन  यांना भेटून मोशी न्यायालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे व मंजूर असलेली दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व सत्र न्यायालय तसेच मोटार वेहिकल कोर्ट लवकरात लवकर चालू करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट  असोसिएशनने जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मोरवाडी कोर्ट येथे नव्याने चालू करण्यात येणारे सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरच्या मोरवाडी व मोशी येथील न्यायालयाचे बांधकामाची पाहणी करताना जिल्हा न्यायाधीश मे.महाजन साहेब आणि में.मोरे साहेब व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारणी उपस्थित होते. सदर वेळी उपस्थित माजी अध्यक्ष नारायण रसाळ,माजी अध्यक्ष सुनील कडुसकर माजी अध्यक्ष किरण पवार माजी अध्यक्ष प्रमिला गाडे, प्रतीक जगताप,ॲड.तेजस चवरे, ॲड.पल्लवी कुऱ्हाडे, तुषार खरात ,नारायण थोरात, ॲड.विजय भगत,ॲड. शांताराम दामगुडे,ॲड.ओमकार नानेकर, इत्यादी वकील वर्ग हजर होते.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. पांडुरंग विठ्ठल शिनगारे उपाध्यक्ष ॲड. अजय रामसुमेर यादव
सचिव ॲड. संदिप भाऊसाहेब तापकीर
महिला सचिव ॲड. संगीता रमेश कुशलकर
सहसचिव ॲड. पदमावती लक्ष्मण पाटील , खजिनदार ॲड. विशाल आसाराम पोळ , हिशोब तपासनीस पदी ॲड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच सदस्य पदी ॲड. विजय धोंडिराम भोंडे, ॲड. अक्षय कमलाकर चौधरी, ॲड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, ॲड. पौर्णिमा भगवान मोहिते, ॲड. रूपाली रामचंद्र पवार , ॲड. सुषमा सुदर्शन पाटील आदी वकील वर्ग उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version