Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे जी. भोसलेपाटील आणि कार्यकारिणी द्वारे ॲड. सुशील मंचरकर यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
 ॲड. संगीता परब, ॲड. शंकर पल्ले, ॲड. वैभव कल्याणकर यांची निवडणूक अधिकारी सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे; तसेच सदर निवडणूक ही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या नियमानुसार व त्यांनी नेमलेले निरीक्षक ॲड. श्रीकांत अगस्ते यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नेहरूनगर, पिंपरी न्यायालयात सकाळी १० ते सायंकाळी ०५:३० वाजता होणार आहे. यामध्ये पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन बारच्या वतीने करण्यात आले आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version