Spread the love


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष बहल म्हणाले की, संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की, २६ नोव्हेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. संविधान दिन आपल्याला नागरिक म्हणून आपले हक्क आणि जबाबदाऱ्या आणि आपल्या देशाच्या मूल्यांची आठवण करून देतो व सविंधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद..!

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, मा.नगरसेवक संतोष बारणे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, प्रदेश सरचिटणीस  शोभाताई पगारे, असंघटीत कामगार अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, उपाध्यक्ष संपत पाचुंदकर, प्रदीप गायकवाड, माऊली मोरे, सामाजिक न्याक विभाग कार्याध्यक्ष यश बोथ, उपाध्यक्ष कुमार कांबळे, सरचिटणीस सुलेमान शेख, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संजय औसरमल यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version