Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे कमी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. या निवडणुकीत ५१.२९ टक्के एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभेत पुन्हा अण्णा बनसोडे आमदार होणार की सुलक्षणा शिलवंत यांची लॉटरी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ एवढे मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत ११.४६ टक्के मतदान, दुपारी १ वाजेपर्यंत २१.३४ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ३१.५८ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.३६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीचे सुलक्षणा शिलवंत यांच्यात थेट लढत होत आहे.
२०६ पिंपरी विधानसभा
सकाळी ०९.०० वाजे पर्यन्त ४.०४ टक्के मतदान
सकाळी ११.०० वाजे पर्यन्त ११.४६ टक्के मतदान
दुपारी १.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- ४७३३७
स्त्री :- ३६१५०
इतर :- ०५
एकूण :-८३४९२
टक्केवारी :-२१.३४%
दुपारी ३.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष -६७६३४
स्त्री -५६०२१
इतर -०६
एकूण -१२३६६१
टक्केवारी -३१.५८%
सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष -८८४५७
स्त्री -७८८३१
इतर -०८
एकूण -१६७२९६
टक्केवारी – ४३.३६%
२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघात सरासरी ५१.२९% टक्के मतदान झाले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version