Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकारी येणार असा ठाम विश्वास महायुतीच्या पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. आमदार अण्णा बनसोडे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी लवकरात लवकर घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. मागील 20 ते 25 दिवसांपासून सुरू असलेली रणधुमाळी संपली असून आता मतदारातले काम करणार आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येणार आहे. असा मला ठाम विश्वास असल्याचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.

आमदार अण्णा बनसोडे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. चिंचवड स्टेशन येथील कै गंगाराम बहिरवडे प्राथमिक शाळा येथे त्यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version