Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी-काळेवाडी परिसरातील आदर्शमाता, सौ. बेबीताई बाबासाहेब तापकीर यांचे मंगळवार दि. १२-११-२०२४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.

तापकीर कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेती व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्याची आवड त्यांनी जपली. शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान होते. पंचक्रोशीत त्या “ताई” म्हणून परिचित होत्या.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. बाबासाहेब तापकीर यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या मागे पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
बेबीज् इंग्लिश हायस्कूल चे अध्यक्ष हेमंत तापकीर व सामाजिक कार्यकर्ते हरेश तापकीर त्यांचे पुत्र होत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version