पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव येथे आरोग्य विभागातील पिंपळे गुरव ,नवी सांगवील कंत्राटीपद्धतीने स्वच्छता करणाऱ्या कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली. आपण दिवाळी आनंदात कुटुंबासोबत साजरी करत असतो परंतु कंत्राटी पद्धतीने काम करणारे आपले बंधू भगिनी आपल्यासाठी आपली दिवाळी सण आनंदात जावा म्हणून ते सणांमध्ये सुद्धा सुट्टी न घेता स्वच्छता करत असतात म्हणून स्वच्छता करणाऱ्या बंधू भगिनीची दिवाळी गोड व्हावी म्हणून भाऊबीजेसाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून “आपल्याला समाजाचे ‘काहीतरी देणे आहे आणि ते दिले पाहिजे” या उदात्त भावनेतून सामाजिक कर्तव्य समजून प्रत्येक महीलेला पैठणी साडी व एक मिठाई व पुरुषांना मिठाई देण्यात आली त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच दिवाळी झाल्याचे समाधान आम्हाला वाटले असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी म्हटले आहे.
संस्थाध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की 15 दिवस आमच्या कार्यकर्तेनी घेतलेले परिश्रम व त्याचे चीज झाले आम्हाला ही खूप आनंद झाला खऱ्या गरीब गरजूवंतापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळाले यापुढे आमची संस्था गोरगरीब वंचितांच्या पाठीशी राहील असे समाज उपयोगी उपक्रम यापुढे आमची संस्था राबवेल असा विश्वास कुचेकर यांनी व्यक्त केला.
उपस्थित नागरिकांना मतदान जनजागृतीची शपथ ही देण्यात आली.यावेळी पुरुष व महीलांनी उखाणे घेऊन आनंद व्यक्त केला.
यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, ह प्रभाग मुख्य आरोग्य आधिकारी उद्धव ढवरी साहेब, ह प्रभाग समूह संघटक आधिकारी वैशाली लगाडे,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे ,सस्थेचे खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर,जेष्ट नागरिक महासंघाचे अध्यक्षा वैशाली मरळ सचिव ईश्वरलाल चौधरी ,शहर सचिव गजानन धाराशिवकर, शुभम उद्योग सुपरवायझर दिपा गराडे,पवन गंधे,प्रकाश वीर ,सामाजिक कार्यकर्त्या वनिताताई चव्हाण,मुरलीधर दळवी, गणेश वाडेकर,भास्कर कुचेकर,अंकुश कांबळे पुजा जाधव, जयश्री आरणे,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
