Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून मागील वर्षात घडलेल्या घटना नागरिकांना आवडलेल्या नाहीत, मतदारांना प्रत्येक वेळी गृहीत धरून राजकारण करणे हे महायुती सरकारला अवघड जाणार असून पिंपरी मतदार संघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. सुलक्षणा शिलवंत धर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
नगर-पारनेर मधील पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा मोशी येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना ,राष्ट्रवादी ची फोडाफोडी नागरिकांना आवडली नसून शरद पवार साहेबांच्या सोबत राहणाऱ्या निष्ठावंत पदाधिकऱ्यांसोबत नागरिकांची प्रचंड सहानभूती आहे तसेच महायुती सरकार विरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली असल्याने डाॅ. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय सोपा झाला आहे असेही ते म्हणाले. यावेळी डाॅ. सुलक्षणा शिलवंत यांनी पारनेर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांचीही भेट घेतली. डॉ.सुलक्षणा शिलवंत यांचे सोबत यावेळी इखलास सय्यद, जिब्राईल शेख, राजेश रोचिरामनी, यशवंत भालेराव, सज्जू वर्गीस, गणेश काळे, लकी गालफडे, सागर जगताप, मिनेश काची, रोहिणी वारे उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version