Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अमर गवारे, अजय गायकवाड, पुंडलिक ठाकूर, राजेंद्र बर्गे हे उपस्थित होते.

ॲड. संदीप चिंचवडे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. उच्चशिक्षित, अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. ते चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीव्र इच्छुक होते. दरम्यान हा मतदारसंघ महायुतीत भाजपला गेल्यामुळे ॲड. संदीप चिंचवडे यांनी अपक्ष मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.
मी चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष निवडणूक घडवणार आहे. मतदारसंघातील सोसायट्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, वारंवार खंडित होणारा वीजेचे प्रश्न यासह नागरिकांच्या मूलभूत प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. शहरात मोठे मोठे सोलर पार्क उभारणार आणि नागरिकांना ५ रू/युनिट ने वीज मिळवून देणार आहे.
– ॲड. संदीप चिंचवडे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version