Spread the love

 

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी २०५ चिंचवड मतदारसंघाच्या थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.

या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या तसेच स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या आदी संबंधित अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहे.

एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, तळ मजला, थेरगाव याठिकाणी संपर्क साधावा, असेही अनिल पवार यांनी सांगितले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version