Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे आणि नुकताच पक्ष प्रवेश केलेले रवी लांडगे हे तीव्र इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभेत मोरेश्वर भोंडवे यांनी देखील दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलून पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊन वेगळी भूमिका घेऊ असा सूर या बैठकीत सर्वांचाच होता.

शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ निष्ठावंत पदाधिकारी यांना डावलून पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्यास भोसरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यासंदर्भात शिवसेना संपर्कप्रमुख यांना देखील याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

आज भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांची सर्व शिवसैनिक अंगीकृत संघटना, महिला आघाडी, युवासेना यांची एक बैठक झाली. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version