Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मधुकर बच्चे युवा मंच व वूई टुगेदर फाउंडेशन वतीने आयोजित घरगुती गौरी -गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार  चिंचवड येथे पार पडला.

या स्पर्धेत एकूण 210 लोकांनी सहभाग घेतला.
गौरी व गणपती सजावट साठी एकूण अनुक्रमे चार चार बक्षीस देण्यात आली.

गौरी प्रथम क्रमांक शोभा लुकर द्वितीय:अनिता भारुळे, तृतीय :मेघा जाधव चौथा पूजा जैन
गणपती सजावट:प्रथम क्रमांक पृथ्वीराज मोरे द्वितीय: दिलीप चक्रे त्रितिय:चंद्रशेखर पगार चौथा :ऋषिकेश वाळुंज यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली.
तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
वूई टुगेदर फाउंडेशन संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर,भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे,भाजपा जेष्ठ नंदू भोगले,भाजपा ओबीसी आघाडी नेत्या, सोनाताई गडदे,दारासिंह मन्हास,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

योगाचार्य म्हणून चिंचवड मध्ये परिचित आहेत तसेच बाबा रामदेव यांनी त्यांचा व त्यांच्या साधकांचा गौरव केला आहे अनेक मिडल,पुरस्कार मिळाले आहेत अश्या वैशाली देशमाने यांना विशेष संम्मानित करण्यात आले.
तसेच   अत्यन्त पार्दर्शक परीक्षण केले असे परीक्षक मंगला डोळे -सपकाळे,अर्चना बच्चे,जयंत कुलकर्णी, यांचा संयोजकाच्या वतीने विशेष सन्माण करण्यात आला.
गणेश बच्चे,राजू कोरे,पोपट बच्चे,रोहिणी बच्चे,अर्चना बच्चे,काजल बच्चे,अक्षय गारगोटे,असावरी बच्चे,आकाश खिल्लारे, आदिनी कार्यक्रमास पूर्ण योगदान दिले व कार्यक्रम यशस्वी करण्यास मोठा सहभाग घेतला.

उपस्थितामधून लक्की ड्रॉ काढण्यात आला काकडे पार्क मधील 75 वर्ष असणाऱ्या पिंगळे आज्जी यांना पैठणी मिळाली जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे, श्रीरंग दाते,सदाशिव गुरव,शंकरराव कुलकर्णी ,दारासिह् मन्हास,दिलीप पेटकर,क्रांती कुमार कडुलकर,
गुरूराज फडणीस ,राजेश डोळे,दिनेश भारुळे,सिद्धू लोणी,कमल साहि, मच्छिन्द्र थोरवे, सरिता कुलकर्णी आदिनी या उपक्रमात अथक परिश्रम घेतले.
मधुकर बच्चे यांनी आपल्या देशातील
दाणशूर, महान उद्योगपती स्वर्गीय रतन जी टाटा यांच्या विषयी आठवणीना उजाळा देऊन रतन जींना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.दारासिंग मन्हास यांनी आभार मानले.आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version