Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कासारवाडी येथील ज्येष्ठ समाजसेवी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोककुमार पगारिया आणि कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे कार्याध्यक्ष श्रेयस अशोककुमार पगारिया या पिता पुत्रांना नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली या संस्थेने आदर्श पिता पुत्र समाज भूषण पुरस्कार नुकताच आळंदी येथील जैन स्थानकाच्या सभागृहामध्ये आनंद शिष्यरत्न ,प्रवचन प्रभाकर, परमपूज्य प्रशांत ऋषीजी आणि परमपूज्य विजय स्मिताजी म सा यांच्या सानिध्यात प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या अध्यक्षा अनिता नहार , आळंदी संघाचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर ,ज्येष्ठ समाजसेवी कांतीलालजी मुनोत, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुवालालजी बोरा आदि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हे पिता पुत्र सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. प्रा अशोककुमार पगारिया हे श्री ऑल इंडिया शेतांबर स्थानकवाशी जैन कॉन्फरन्स चे पूर्व राष्ट्रीय महामंत्री आणि पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि अशा अनेक संस्थांवर गेली 40 वर्षापासून ते काम करीत आहेत त्यांचे चिरंजीव श्रेयस पगारिया हेही पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे कार्याध्यक्ष असून कासरवाडी जैन संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली कासारवाडी येथील जैन स्थानकात उपप्रवर्तिनी प पू मंगल प्रभाजी म सा ,प पू डॉ मधुस्मिताजी म सा ,प पू हर्षिताजी म सा आणि प पू दिव्यांशीश्रीजी म सा यांचा, अध्यात्मिक दृष्टीने एक ऐतिहासिक आणि सुंदर चातुर्मास संपन्न होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version