Spread the love

विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये हजारो भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शनिवारी, विजयादशमीच्या दिवशी दुपारची आरती विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिरातील दीपोत्सवात भाविकांनी सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता रविवारी श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगलस्नान, गोपाळकाला, माध्यान्ह आरती, धुपारती, शेजारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version